Pune : पुणे-मिरज- कोल्हापूर लोहमार्गाचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षांपासून जोमात सुरू आहे. मात्र, त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी मात्र कोमात जाण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू केलेला सुकलवाडी फाट्यानजिकचा रेल्वेचा बायपास काम अजून अपूर्णच आहे.(Miraj – Kolhapur railway)

रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी पुणे-कोल्हापूर या लोहमार्गाचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. पाच वर्षांपूर्वी सुकलवाडी फाट्यानजीक पालखी तळावर जाणारा जुना रस्ता बंद करून अकरा दिवसांत बायपास पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रेल्वे प्रशासन या भुयारी मार्गातील पाणी काढण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. ते काम अजूनही अपूर्ण असताना आता पुन्हा एकदा वाल्हेजवळ वागदरवाडी येथे नजिकच्या पाझर तलावालगत भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे. रेल्वे प्रशासन दिलेले आश्वासन पळत नाही त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होते याची तुम्ही जबादारी घेणार काय.

Advertisement

काम थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन
तालुक्यातील इतर भुयारी मार्गांचे अनुभव पाहता सुकलवाडीतील भुयारी मार्ग थेट पाझर तलावालाच खेटून असल्याने पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडूंब पाणी साचून हा मार्ग वाहतुकीस बंद होण्याचा संभाव्या धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आहे. ग्रामस्थांनी रेल्वेच्या सातारा, पुणे विभागासह पुणे मंडल अधिकाऱ्यांना काम थांबविण्याबाबतचे निवेदने दिल्याचे पोपटनाना पवार, शांताराम पवार, कांतिलाल भुजबळ, अंकुश पवार, धनंजय पवार, विठ्ठल पवार आदींनी सांगितले.