मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) भाजप (BJP) नेत्यांवर कडाडून टीका केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी सिनेस्टाईल डायलॉग (Cinestyle Dialogue) मारत भाजप नेत्यांवर टीका केली. संजय राऊत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद घेतली.
भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक नेत्यांनी हा फ्लॉप पिच्चर झाला असल्याचीही टीका केली आहे. तसेच मनसेनेही (MNS) संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फार मोठे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गाजावाजा करणाऱ्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' असं झालं आहे. फक्त आरोप करून काही होत नाही, त्यासाठी पुरावेसुद्धा असावे लागतात, हे राऊतांना कळलं पाहिजे. pic.twitter.com/PUpdBJ2nKc
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 15, 2022
चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फार मोठे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गाजावाजा करणाऱ्या संजय राऊत यांनी केला. पण, यांची पत्रकार परिषद म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुहा’ असे झाले आहे.
फक्त आरोप करून काही होत नाही, त्यासाठी पुरावेसुद्धा असावे लागतात, हे राऊतांना कळले पाहिजे. अडचणीत आलेला माणूस थयथयाट करतो, संजय राऊतांचं तसेच झाल्याचे सांगत पाटलांनी राऊतांवर टीका केली आहे.