Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मृतांच्या नातेवाईकांना मिळणार तब्बल एवढी मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा

सोमवार दिनांक ७ एप्रिलला पुण्याजवळील उरवडे येथील सॅनिटायझर कंपनीला आग लागली होती. त्या आगीमध्ये १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्या आगीत मृत पावलेल्या मजुरांना सरकारने मदत जाहीर केली आहे.

मृताच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. या बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती देताना म्हटले आहे की, ही आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.

कुलिंग ऑपरेशन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आगीचे प्राथमिक कारण समजू शकणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळच्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग केली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आग का लागली होती यासंदर्भातील माहिती पुढे येणार आहे.

Advertisement

या आगीची माहिती जेव्हा जिल्हा पोलीस दलाला कळली तेव्हा पोलीस पथक आणि अग्निशामक दल सोबतच या ठिकाणी पोहोचले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पण झाल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की,

आगीत झालेल्या कामगारांचा मृत्यू ही खूपच दुःखद घटना आहे. आग आटोक्यात आणून कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण काही जणांना वाचवता आले नाही. अशा दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Leave a comment