Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

संशोधनाचा अभ्यासक्रम शंभर विद्यार्थ्यांकडून पूर्ण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पीएच.डी’साठी प्रवेश घेतलेल्या शंभर विद्यार्थ्यांनी ‘रिसर्च ॲण्ड पब्लिकेशन एथिक्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यापीठ अनुदान आयोगाने तो अनिवार्य केला आहे.

दोन श्रेयांक

विद्यापीठातील ‘सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स’ विभागाने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यासाठी दोन श्रेयांक देण्यात आले असून एका महिन्याचा कालावधी आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी संशोधनातील नीतिमत्तेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संशोधन करण्याचा सल्ला

विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना कष्ट करत उत्तम संशोधन करण्याचा सल्ला दिला.

Advertisement

अभ्यासक्रमात तत्त्वज्ञानाचे स्वरूप त्यातील विविध शाखा, त्याचा संशोधनाशी संबंध, जगभरातील संशोधनाची मानके, वाड्.मयचौर्य, बनावट प्रकाशने आणि नियतकालिके ओळखण्यासाठीची साधने, तंत्रे याचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सेंटरच्या प्रमुख डॉ. शुभदा नगरकर म्हणाल्या, ‘‘अभ्यासक्रमादरम्यान भारतातील विविध विषयात पारंगत असलेल्या तज्ज्ञांना आमंत्रित केले होते.

अभ्यासासाठी लागणारे संदर्भ साहित्य ऑनलाइन स्वरूपात ‘मुडल सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात आले.’’ डॉ. भाऊसाहेब पानगे, प्रा. एमेरिटस यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

 

Leave a comment