file photo

मुंबई : दहावीच्या निकालाची तयारी सुरू असली, तरी गुण भरण्याचे काम किचकट असल्याने दहावीच्या निकालाला उशीर लागत आहेत. त्यात त्रुटी असल्याने निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगणकीय प्रणालीतील नोंदीत त्रुटी

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळांकडून निकालासंदर्भात संगणकीय प्रणालीमध्ये करण्यात आलेल्या नोंदी आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा

दहावी निकालासंदर्भात राज्यातील सर्वंच शाळांनी शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाकडे संगणकीय प्रणालीमार्फत विद्यार्थीनिहाय गुण नोंदणी उपलब्ध करून दिली आहे;

Advertisement

मात्र यात नोंद करताना त्रुटी, चुका राहिल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने मंडळाने या चुका दुरुस्त करून देण्याचा आदेश शाळांना दिला होता. यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत राज्यातील ९७ टक्के शाळांनी आपले कामकाज पूर्ण केले आहे;

मात्र तरीही काही चुका राहिल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतरही त्रुटी राहिल्यास शाळा आणि मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे.

१ ७ टक्के निकालाचे कामकाज शिल्लक

कोरोना आणि त्यामुळे राज्यात कडक निर्बंध असतानाही शाळा आणि शिक्षकांकडून निकाल आणि त्यासाठीचे कामकाज तयार करण्यासाठी बरेच मोठे परिश्रम घेतले असल्याने राज्यात केवळ दहा टक्के तर मुंबईत १७ टक्के निकालाचे कामकाज शिल्लक राहिल्याचे परीक्षा मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं.

Advertisement