ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मनसेची भूमिका ‘एकला चलो रे’ चीच राहणार

आगामी निवडणुकांमध्ये मनसेचे वातावरण चांगलेच असेल. सध्या माझं इंजिन मीच चालवतोय. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.

राज यांच्या हस्ते आज पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना, ‘या कार्यालयातून निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झालीय का? तर हो झालीय, असं ते म्हणाले

विमानतळाचं नाव बदलण्याचा प्रश्नच नाही

विमानतळाच्या नामकरण प्रकरणी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरे म्हणाले, की विमानतळाच्या नामकरणावर मी बोललो आहे.

मी पुण्यात स्थायिक झालो, तर मी राज मोरे नाही होणार. राज ठाकरेच राहणार आहे. विमानतळ फक्त शिफ्ट होत आहे, तर नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही.

खडसेंच्या सीडीची पाहतोय वाट

ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, की काँग्रेस असताना ही असाच गैरवापर झाला. भाजप असतानाही तोच वापर होतोय.

ईडीचा बाहुली म्हणून वापर करू नये. ज्यांनी खरे गुन्हे केले, ते गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय.

राणे यांना फोन केला; पण बंद

राज ठाकरे म्हणाले की, नारायण राणे मंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केले होते पण त्यांचे फोन बंद होते. त्यांच्या मुलाला पण फोन केला होता, असं ते म्हणाले.

 

You might also like
2 li