Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सत्ताधारी गटाचाच पीएमपीचा संचालक; परंतु धावपळ

पुणे महापालिकेत भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे पीएमपीच्या रिक्त झालेल्या संचालकपदावर भाजपचाच संचालक होणार हे स्पष्ट होतं; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याने भाजपची तारांबळ उडाली.

अजित पवारांची मनधरणी नाही आली कामाला

संचालकपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी भाजपने खटाटोप सुरू केला, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून विनंती केली; मात्र त्याचा कोणताही परिणाम विरोधकांवर न होता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांची बहुमताने निवड झाली.

हे होते उमेदवार

गेल्या महिन्यात पीएमपीचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा घेण्यावरून भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने प्रदेश पातळीवरील नेत्यांना यात लक्ष घालावे लागले होते.

Advertisement

पीएमपीवर संचालक नियुक्त करण्याचा प्रस्ताव मुख्यसभेसमोर आला होता. भाजपकडे बहुमत असल्याने त्यांचाच नगरसेवक संचालक म्हणून जाणार हे स्पष्ट होते.

ऑनलाइन सभा असल्याने मतदानासाठी वेळ जातो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सभागृहनेते गणेश बिडकर यांचे प्रयत्न सुरू होते.

भाजपने नगरसेवक प्रकाश ढोरे यांचे नाव दिले तर, राष्ट्रवादी काँग्रेसने वनराज आंदेकर यांना संचालकपदाचा उमेदवार केले.

Advertisement

मतदान घेण्याची वेळ येणार असल्याने भाजपची चांगलीच धावपळ उडाली. नगरसेवकांना ऑनलाइन सभेत दाखल होण्यासाठी निरोप पाठवावे लागले, तर दुसरीकडे विरोधकांची मनधरणी करावी लागली.

भाजपला विरोध

सहा महिन्यांवर महापालिकेची निवडणूक आहे, अशा स्थितीत भाजपला कोणीही विरोध करत नाही असा संदेश जाऊ देणे चुकीचे होते. त्यामुळे हरलो तरी चालेल; पण निवडणूक लढवायची अशी भूमिका घेतली.’असे विरोधी पक्षनेते प्रशांत जगताप यांनी सांगितले.

 

Advertisement
Leave a comment