file photo

जुन्नर : जिल्हाधिका-यांनी पर्यटनाला बंदी घातली असताना ती बंदी धु़डकावून आणि पोलिसांची नाकेबंदी चुकवून पर्यटक मोठी गर्दी करीत आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांनजीकच्या गावात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

दा-या व नाणेघाट परिसरात गर्दी

जुन्नर तालुक्यातील दाऱ्या व नाणेघाट परिसरात पर्यटनास बंदी असतानादेखील येथे शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

विविध ठिकाणांहून दुचाकी- चारचाकी वाहनातून आलेल्या पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून यामुळे गावची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

Advertisement

तरी येथे येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालावी अशी मागणी आंबोलीच्या सरपंच नामाबाई अरुण मोहरे, उपसरपंच सखाराम काठे व ग्रामसेवक टी. एस. आंभिरे यांनी जुन्नरचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे तसेच पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्याकडे केली आहे.

पर्यटक स्थानिकांशी घालतात वाद

पुणे, मुंबई, ठाणे येथून येणारे तसेच स्थानिक पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात.

स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रतिकार केला तरी ते दाद देत नाहीत. त्यामुळे वाद होऊन प्रसंगी भांडणे होत असतात. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Advertisement