ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

राज्य सरकारनं मिळवून दिला १५ हजार जणांना रोजगार

कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांचा रोजगार गेला, बेरोजगारी वाढली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही राज्य सरकारने विविध उपक्रम राबवून १५ हजार ३३६ जणांना रोजगार मिळवून दिला, अशी माहिती काैशल्य विकासमंत्री नबाब मलिक यांनी दिली.

गेल्या वर्षी दोन लाख युवकांना रोजगार

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून 2020 मध्ये राज्यात एक लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेर 78 हजार 391 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

वेबपोर्टलवर नोंदणी

या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात.

त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते.

९० हजार उद्योजकांची नोंदणी

महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 90 हजार 260 इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे.

यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात.

त्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.

 

You might also like
2 li