Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आंबील ओढा कारवाईची राज्य सरकार करणार चाैकशीः डाॅ. नीलम गो-हे

“आंबील ओढ्यात जी काही अतिक्रमणविरोधी कारवाई झाली, त्याची चौकशी राज्य सरकार करत आहे.

आतापर्यंत अशा पद्धतीने कुठल्याच झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली नाही; परंतु ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली त्याबद्दल खेद आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली.

अतिक्रमण कारवाईची चाैकशी

पुण्यातील एसआरएच्या कार्यालयात जाऊन डाॅ. गो-हे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली. तसेच आंबील ओढ्यातील अतिक्रमण कारवाईची चौकशी केली.

या वेळी त्यांच्यासोबत आंबील ओढा परिसरातील काही नागरिकदेखील उपस्थित होते. त्यानंतर डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली

महापाैरांनी झोपडपट्टीधारकांची पाठराखण करणे आवश्यक

डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, की पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या कारवाईच्या पाठीमागे कोण आहे याचे उत्तर काळ लवकरच देईल.”

आज नागरिकांशी चर्चा

डाॅ. गो-हे यादेखील बुधवारी आंबील ओढा परिसरात नुकसानग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबील ओढा झोपडपट्टीप्रकरणी डाॅ. गोऱ्हे यांची भेट घेतली.

Leave a comment