मुंबई : काँग्रेस (Congress) नेते (Congress leader) आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महाविकास आघाडीवर होणारी टीका तसेच युती पक्षांच्या नेत्यांची नाराजी यावर मत मांडले आहे.

यावेळी ते म्हणाले की, तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काही प्रश्न नक्की असून, ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत. तसेच काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का, या प्रश्नावर बोलताना, असे काही म्हणणार नाही.

प्रश्न आहेत, हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून ते सोडवले जातील, असेही थारोत म्हणाले आहेत.

Advertisement

यासंदर्भात काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. ही माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितली आहे.

तसेच काँग्रेस नेत्यांच्या या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि नाना पटोले (Nana Patole) सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जरी एका पक्षाचे सरकार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत, असे थोरात यावेळी बोलले आहेत.

Advertisement