पुणे : रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी नुकताच मनसे (MNS) पक्षाचा सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली पाटील यांनी पहिल्यांदाच भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. येत्या काही दिवसात महापालिका निवडणूक (Municipal elections) होणार आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात हालचाली सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भुसावळमधील भाजपच्या नगराध्यक्षांसह (Mayor) २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

तसेच सावदा ता. रावेर येथील नगराध्यक्षा अनिता येवले (Anita Yevale) यांच्यासह ८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. याच पार्शवभूमीवर रुपाली पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे संकट मोचक संकटात आले आहे. मदमस्त सत्तेची सूज हळूहळू वसरत आहे आसा खोचक टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

महानगर पालिकेच्या तोंडावर भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत आल्यामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

Advertisement