छत्रपती शिवाजी महारांजाचा देशातील सर्वांत उंच असा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा आैरंगाबादमध्ये उभारण्यात येणार आहे. तो तयार करण्याचे काम पुण्यात सुरू असून, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात जाऊन त्याची पाहणी केली.

पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वांत उंच अशा पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुतळ्याची औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक येथे स्थापना करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा हा आजवरचा देशातील सर्वाधिक उंच असा पुतळा असेल.

पुतळ्याचा आकार

6 टन वजन, 21 फूट उंच, 22 फूट लांबी तसेच 31 फूट उंच चौथरा असेलला भव्य दिव्य असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल. दरम्यान, गेल्या ब-याच दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे.

Advertisement

क्रांतीचौकातील महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी सर्व नागरिक उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खास पुण्यात जाऊन या पुतळ्याच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

तसेच पुतळ्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकेल याची चाचपणी केली. देसाई यांच्या या पाहणीमुळे लवकरच शहरात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होईल असा अंदाज लावला जात आहे.

 

Advertisement