पुणे : थेरगाव क्वीन (Thergaon Queen) नावाने इंस्टाग्राम (Instagram) चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी वाकड पोलिसांनी (Wakad Police) गुन्हा (Crime) दाखल करत तिला अटक (Arrest)  केली होती. आटा याच मुलीने इंस्टाग्राम व्हिडीओ द्वारे थेट पोलिसांनाच चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव क्वीन या नावाने इंस्टाग्राम अकाऊंट वरून अश्लील शिवीगाळ करत एका अल्पवयीन मुलीने व्हिडीओ (Video) पोस्ट (Post) केले होते. त्याप्रकरणी तिला पोलिसांनी तिला अटकही केली होती.

या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पोलिसांनी सोडल्यानंतर पुन्हा एकदा तिझी मिजास पाहायला मिळाली आहे. पोलिसांनी अटक करूनही तिझी मस्ती उतरली नसल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

Advertisement

या मुलीने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ बनवत थेट पोलिसांनाच चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पोलीस पुन्हा तिच्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मुलीने व्हिडीओ पोस्ट करत ‘मोठी हस्ती आहे आपण, तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालुन किती पण दगडं मारु द्या आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं’असे व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

Advertisement

तसेच या व्हिडीओ ला ‘अख्ख्या ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो. असे बॅकग्राऊंड गाणंही टाकले आहे.