Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सरकार भक्कम असल्याचा तिन्ही पक्षांचा सूर

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष दररोज प्रयत्न करीत आहे. त्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राचे आयते कोलित भाजपच्या हाती लागले आहे.

शिवसेना-भाजपसोबत पॅच करण्याची शक्यता व्यक्त होत असताना आता तीनही पक्षांनी एका सुरात सरकार भक्कम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

स्थैर्याबाबत शंका नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं काम उत्तमरित्या सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्तp केला आहे.

Advertisement

काँग्रेसची स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू असली तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. पाच वर्षे हे सरकार चालेल, असे काँग्रेसकडूनही सांगण्यात येत आहे.

त्या सुरात सूर मिसळत राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकारच्या स्थैर्याबाबत कोणतीच शंका नसल्याचे स्पष्ट केले.

आॅपरेशन लोटस कुचकामी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिका यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपवर जोरदार निशाणा साधला.

Advertisement

भाजप दररोज आपलं सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे… उद्या सरकार जाणार आहे, असे बोलत आहे; परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार जाणार… सरकार लवकरच कोसळणार ही भाजपची भविष्यवाणी एकदाही खरी ठरलेली नाही.

त्यांनी सरकार कधी जाणार हे सांगताना तारखा दिल्या; पण या तारखा निघून गेल्या, तरी सरकार भक्कमपणे काम करत आहे, अशा शब्दांत ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात कुचकामी असल्याचे सांगण्याचा मलिक यांनी प्रयत्न केला.

Advertisement
Leave a comment