file photo

पुणे : भारतात तयार होणा-या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी घेतल्या, तर युरोप व अन्य देशांत जाण्यात अडचणी येत आहेत.

भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आले नसले, तरी या प्रश्नातून लवकरच मार्ग निघेल, असा आशावाद ‘सीरम’ चे ‘सीईओ’ आदर पूनावाला यांनी व्यक्त केला.

युरोपीय संघाची मनमानी

परदेशी जाणाऱ्या भारतीयांसाठी पूनावाला यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपीय राष्ट्रांत प्रवासासाठी अडचणी येत होत्या.

Advertisement

यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपीयन महासंघाने कोव्हिशिल्डला वगळले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरही युरोपीय संघाची मनमानी पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले अदर पुनावाला?

“कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या ब-याच भारतीयांना युरोपीय संघातील देशांमध्ये प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे मला समजले आहे.

Advertisement

मी सर्वांना हमी देतो, की मी हे प्रकरण उच्च स्तरावर उचलून धरले आहे. संबंधित देशांसोबत नियामकासह राजनैतिक पातळीवरही लवकरच ही समस्या मिटण्याची आशा आहे.” असं ट्वीट पूनावाला यांनी केलं आहे.

एक जुलैपासून युरोपीयन देशांमध्ये डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट अंमलात आणण्याची तयारी आहे. त्यानुसार युरोपीय काम किंवा प्रवासाच्या निमित्ताने जगभर भ्रमंती करू शकतात.

सीरम इन्स्टिट्यूट विरोधातील याचिका फेटाळली

दरम्यान, क्यूटीस या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटविरोधात दाखल केलेली याचिका जानेवारी महिन्यात फेटाळण्यात आली होती.

Advertisement

सीरमने कोव्हीशिल्ड लसीसाठी ट्रेडमार्क वापरल्याचा आरोप क्यूटीस कंपनीने केला होता. ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा क्यूटीस कंपनीने केला होता.

त्यासाठी क्यूटीस कंपनीने पुणे जिल्हा न्यायालयात याचिका दाकल केली होती. याच याचिकेवर निकाल देताना दोन्ही वेगवेगळी उत्पादनं आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम होण्याचं कारण नाही, असं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली होती

Advertisement