आपण वारंवार‘देव तारी त्याला कोण मारी’ ही मराठीतील म्हण वारंवार ऐकतो. त्याचा काहींना प्रत्ययही येतो. असाच अनुभव अर्नाशा येथील रिक्षाचालकानला आला.
केसालाही नाही लागला धक्का
अर्नाळ्याच्या विसावा रेसॉर्ट येथे कस्टमरला घेवून जाण्यासाठी आलेल्या रिक्षावर एक भलंमोठं नारळाचं झाड पडलं. यात रिक्षाचा चेंदा झाला; परंतु सुदैवाने रिक्षाचालक यात वाचलेला आहे.
याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भलं मोठं झाड रिक्षावर कोसळलं, पण ड्रायव्हरच्या केसालाही धक्का लागला नाही! रिक्षात केवळ रिक्षाचालकच होता.
नशील बलवत्तर म्हणून..
हॉटेल विसावा या रिसॉर्टमध्ये ही रिक्षा कस्टमरला नेण्यासाठी आली होती. कस्टमरची वाट बघण्यासाठी त्याने रिक्षा पार्किंगमध्ये उभी केली होती. अचानक नारळाच झाड रिक्षावर कोसळलं.
रिक्षा दोन ते तीन इंच मागे असती, तर कदाचित या रिक्षावाल्याच्या अंगावर झाड पडल असतं; पण नशीब बलवत्तर म्हणून हा रिक्षावाला वाचलेला आहे.
रिसॉर्टच्या मालकाने रिक्षाचालकाला सहा हजारची आर्थिक मदत ही केली आहे. सद्या रिक्षा दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकण्यात आली आहे.
देव तारी त्याला कोण मारी!
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर देव तारी त्याला कोण मारी, फक्त एवढंच वाक्य तोंडातून येतं. एकदा जर ‘उपरवाल्याने’ ठरवलं तर कितीही मोठं संकट आलं, तर माणूस त्या संकटातून बाहेर निघतोच, हे या उदाहरणातून दिसलं.