मुंबई : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) मंत्री एकमेकांविरोधात बोलत आहेत. यामुळे भाजपचे (BJP) मात्र चांगले मनोरंजन होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमने सामने आले आहेत.

यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अहंकार बाजूला ठेवून शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडीबाबत चर्चा करावी, असे एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. कारण आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची आहे.

Advertisement

काही ठिकाणी शिवसेनेची, तर काही ठिकाणी आमची ताकद आहे. त्यानुसार चर्चा होण्याची गरज आहे. परंतु शिवसेनेने एकला चलो… ची भूमिका घेतल्यास त्याचा फटका दोघांनाही बसण्याची शक्यता आहे, असे यावेळी ते बोलले आहेत.

मात्र याबाबत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, शिवसेना फायद्या-तोट्याचा कधीच विचार करीत नसल्याचा पलटवार त्यांनी केला.

तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणाची मने दुखावतील अशी वक्तव्ये करू नये, असा सल्ला सुध्दा शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे.

Advertisement

यामुळे महाविकास आघाडीतील नेते आमचे-तुमचे वर आल्यामुळे आघाडी सरकारमध्ये सध्याच्या परिस्थितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मात्र भाजपचे मात्र चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे.