Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खून करून गुजरातमध्ये पसार झालेल्या दोघांना अखेर पोलिसांकडून अटक

शहरातील मंगळवार पेठेत बेघर व्यक्तीचा काठीने मारहाण करीत खून केल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुजरातमध्ये पसार झालेल्या दोघांना सुरत शहरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी सीसीटीव्हीवरून दोघांचा माग काढला.

सीताराम रामकरण बागरी (३५, रा. कोटा, राजस्थान ) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात खून केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहिर अमर शेख चौकात २७ जुलैला सकाळी नागरिकांना एक अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांना माहिती मिळताच जखमी व्यक्तीस ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement

डोक्यास जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यावरून त्याचा खून झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फरासखाना पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

दरम्यान, रात्रीच्या वेळी बेघर व्यक्तीला छत्री विक्री करणाऱ्या दोघांनी काठीने मारहाण केल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावरील आणि चौकातील सीसीटीव्ही पडताळून पाहिले.

रेल्वे कॉलनीच्या बाजूच्या पदपथावर राहणाऱ्या दोघांनी काठीने बेघर व्यक्तीस मारहाण केल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता ते दोघे गुजरातमधील सुरत शहरात जाउन राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले.

Advertisement
Leave a comment