पुणे : राज्यांमध्ये येत्या १९ आणि २० फेब्रुवारीला अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामातही पिकांच्या नुकसानीला सामना करावा लागण्याची चिंता शेतकऱ्यासमोर (Farmer) उभी राहिली आहे.

याआधीही सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात महाराष्ट्रात (Maharashatra) अनेक भागांत पाऊस झाला आहे. तसेच मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात ७ ते ८ वेळा अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली होती.

आता मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरमध्येही काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Advertisement

तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राबरोबरच मध्य आणि पूर्व भारतातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी ५ दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये (Sikkim) पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये २०-२१ फेब्रुवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत भारतीय हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रावर ढग तयार झाले असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

Advertisement

ते म्हणाले की, “१७ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात ढगांची निर्मिती झाल्याचे उपग्रहामार्फत दिसून आले आहे,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तसेच “ढगांची निर्मिती ही मराठवाडा आणि विदर्भावर होत असल्यामुले या भागामध्ये आगामी दोन दिवसांत कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे,” असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement