Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

‘या’ नेत्याच्या पत्नीचीही ईडी चौकशीला दांडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जसे ईडी चाैकशीला गैरहजर राहण्याचे टाळले होते, तसेच त्यांच्या पत्नीही ईडीच्या चाैकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी वकिलामार्फत कागदपत्रे पाठवून दिली.

ईडीला हवी असलेली कागदपत्रे सादर

देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने (समन्स बाजवले होते. या समन्सनुसार आरती यांना ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र आरती चौकशीसाठी कार्यालयात हजर राहू शकल्या नव्हत्या. त्यांनी ईडीला हवी असणारी कागदपत्रे सादर केली आहेत.

हजर न राहण्याची परवानगी

आरती देशमुख यांना ईडी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चौकशासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते; पण त्या हजर राहू शकल्या नव्हत्या. त्यांनी त्या दिवशी आपले वकील इंदरपाल सिंग यांच्या वतीने ईडी अधिकाऱ्यांना निवेदन पाठवलं होतं.

Advertisement

‘मी चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. आपल्याला जी कागदपत्रे हवी आहेत, ती देते’, असं त्यांनी निवेदनात म्हटलं होतं.

त्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण आपल्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे कागदपत्रे देऊ शकता, असं सांगितलं होतं.

त्यानुसार आरती देशमुख यांनी शुक्रवारी आपले वकील इंदरपाल सिग यांच्यामार्फत आवश्यक ती कागदपत्रे ईडी कार्यलयात सादर केली.

Advertisement

देशमुख यांची मालमत्ता जप्त

अनिल देशमुख यांची चार कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. देशमुखांचा वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एका जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

एक कोटी 54 लाख रुपयांचा वरळीतला फ्लॅट आणि दोन कोटी 67 लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

 

Leave a comment