पुण्यातील लहान मुलांमध्ये बी ए 2 चे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच या व्हेरियंटवर अजूनही संशोधन सुरु आहे. हा नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे, याबाबत संशोधन चालू आहे.

भारतामध्ये कोरोनाचा नवनवीन व्हेरियंट आढळत आहे. नुकतेच पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिगमध्ये लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनचे बी ए 2 चा उपप्रकार आढळून आला आहे.

या व्हेरियंटची लागण ही ६ वर्षा आतील मुलांना झाली असून यात ४ मुलांचा समावेश आहे. तसेच डॉ. निलेश गुजर यांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीला युरोपमध्ये ओमिक्रॉनचा बी ए 1 हा सब व्हेरियंट हा धुमाकूळ घालतो आहे.

Advertisement

आणि आता आपल्याकडे बी ए 2 चे रुग्ण आढळून आले आहेत. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. परंतु नवीन व्हेरियंट किती धोकादायक आहे. याची अजून माहिती व्हायची आहे.

बी ए 1 व बी ए 2 मधील अनेक गोष्टीमध्ये समानता असून या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर घश्यात दुखते, डोके दुखणे, त्यानंतर लहान मुलांना हातपाय दुखणे अशी लक्षणे आढळून येत आहेत.

त्यामुळे लहान मुलांची काळजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. युरोपातील बी ए 1 व आपल्याकडील बी ए 2 मधील अनेक गोष्टीमध्ये साम्य आढळून आले आहे.त्यामुळे ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे.

Advertisement