Pune :  शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणाला क्रेडिट कार्ड बंद करताना डायल केलेल्या चुकीनीच्या नंबरमुळे तब्बल 1 लाख 69 हजारांची फटका बसला आहे.

प्रकार कसा घडला- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण घरी असताना आयसीआयसीआय बँकचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करत होता. त्यासाठी त्याने कस्टमर केअर नंबर सर्च केला. तेव्हा त्याला एका मोबाईल नंबरवरुन फोन आला. त्याने या तरुणाला एनीडेस्क अ‍ॅप व एसबीआय बँक योनो अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सायबर चोराने एनीडेस्क अ‍ॅप कनेक्ट करून घेतले. आता त्या तरुणाला सायबर चोराने पासवर्ड बदलण्यास सांगितले . त्याचवेळेस सायबर चोराने त्याच्या एसबीआय बँक खात्यातून 1 लाख 69 हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेऊन फसवणूक केली.

त्याने प्रथम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर योने अ‍ॅपचा पासवर्ड बदण्यास सांगितले. त्यानंतर हा अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Advertisement