file photo

पुणे रेल्वे स्थानकाजवळील एका जाहिरात फलकावर जात२५ फुटांवरून तरुणाने उडी मारल्याची घटना शुक्रवारी (दि. २४)दुपारी घडली.

या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला ससूनरुग्णालयात दाखल केले आहे.या तरुणाचे नाव समजू शकलेले नाही.

तोया परिसरातील फिरस्ता असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.पुणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात असलेल्या फ्लेक्सवर हा तरुण दुपारी चढला होता.

Advertisement

त्याहून खाली पाहत उभा होता.ही बाब लक्षात आल्यावर स्थानिकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले.
हा प्रकार समजल्यावर पोलीसघटनास्थळी पोहोचले.

अग्निशामक दलाचे जवानही जाळी घेऊन तेथेपोहोचले. मात्र, त्यांना हुलकावणी देऊन त्याने विरुद्ध दिशेला उडी मारली.
पुणे लोहमार्ग स्थानकाचे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

Advertisement