Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तरुणाचे नग्न फोटो काढून तरुणीने केले ब्लॅकमेल

राज्यभरच आता हनीट्रॅपचे प्रकार वाढले आहेत. कोण कशाप्रकारे व्यावसायिक, अधिकारी, राजकारण्यांना गुंतवून ब्लॅकमेल करील, याचा भरवसा नाही. पुण्यात सायबर क्राईमचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

व्हाट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला असता तरुणीने तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट करून त्याला ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे.

व्हिडिओच्या आधारे सातत्याने पैशाची मागणी

सतत पैशांची मागणी होऊ लागल्यानंतर तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. पुणे पोलिस अधिक तपास करत असून २९ वर्षीय तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा मांडवा परिसरात राहत असून तो एका खासगी कंपनीत काम करतो. जानेवारी महिन्यामध्ये फेसबुकवर त्याची एका तरुणीशी ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली.

आॅनलाईन सेक्स पडला महागात

दोघांमध्येही संभाषण अधिक वाढले असता एकमेकांचे नंबर एक्सचेंज झाले. दोघेही रोज फोनवर बोलायला लागले. यानंतर फिर्यादीने तरुणीकडे ऑनलाईन सेक्स करण्याचा हट्ट धरला.

दोघांचे व्हिडीओ कॉलिंग सुरू असताना तरुणीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट केला आणि स्क्रिनशॉट काढले.

यानंतर तरुणीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे पैशांची मागणी केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी तरुणाने भीतीपोटी आतापर्यंत 18 हजार तरुणीला दिले आहेत.

पैशाची भूक भागेना

वारंवार पैसे देवूनही तरुणी गप्प राहत नसल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अनोळखी तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a comment