Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तरुणाला तिघांकडून एक कोटी १५ लाखांना गंडा

नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत असून भांडवलापोटी पैसे पुरविल्यास ३१. २ टक्के इतका आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका तरुणाला एक कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

या तिघांविरोधात गुन्हा

हडपसर पोलिसांनी प्रतित अशित शहा (रा. आयव्हरी इस्टेट, बाणेर), कृतिका अशित शहा (रा. रहेजा इस्टेट, बोरीवली) आणि हितेश बदानी (रा. लुल्लानगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अॅमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये राहणा-या ३१ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१७ ते ३१ जुलै २०२१पर्यंत घडला आहे़.

Advertisement

असा केला विश्वास संपादन

आरोपींनी तरुणाला नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत आहे, असे सांगून या प्रकल्पासाठी भांडवल नाही. त्याकरीता पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून एक कोटी रुपये दिल्यास त्या बदल्यात ३१.२ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले.

त्यानुसार तरुणाने त्यांना एक कोटी रुपये दिले. त्यानंतर साईटवर अपघात झाल्याचे सांगून आणखी १५ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले.

त्यानंतर त्यांनी तरुणाचा विश्वास बसावा, म्हणून मुंबईतील कॅपिटल फर्स्ट या बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून त्या मंजुरीचे बनावट पत्र तयार करुन खरे असल्याचे भासविले.

Advertisement

त्यानंतर वेळोवेळी तरुणाने गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावरील मोबदला मागितला असता त्यांनी टाळाटाळ केली.

 

Advertisement
Leave a comment