धबधब्यात पडलेला युवक ४८ तासानंतरही बेपत्ता

भीमाशंकर : पावसाळ्यात भीमाशंकरनजीकचे धबधबे पाहण्यासाठी युवक मोठ्या संखयेने येत असतात. शिक्रापूर येथून आलेला लक्षम्ण लहारे हा तरुण कोंढवळ येथील धबधब्यात पडला. गेल्या ४८ तासांतही त्याचा शोध लागलेला नाही.

पावसामुळे मदतकार्यात अडथळे

या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत.मुसळधार पाऊस झाल्याने कोंढवळ धबधब्याच्या पाण्यात वाढ झाली आहे.

पाय घसरून पडला धबधब्यात

लक्ष्मण लाहारे हा त्यांच्या मित्रांसोबत कोंढवळ येथील धबधबा पाहण्यासाठी आला होता. या वेळी त्याचा पाय घसरून तो धबधब्यात कोसळून बेपत्ता झाला होता. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र, त्याचा शोध लागला नाही.

एनडीआरएफचे पथक दाखल

सकाळी एनडीआरएफचे पथक शोधकार्य करण्यासाठी दाखल झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.