आखाड महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहर केला जातो; मात्र आखाडी साजरी करण्यासाठी एकानं थेट कोंबड्यांचीच चोरी केली आहे.

हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल वीस गावरान कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. आखडीसाठी चक्क कोंबड्या चोरल्याने हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले ?

रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हिंगणेमळा याठिकाणी ही घटना घडली आहे. शॉप मालक अस्लम इस्माईल शेख यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

आज रविवार असल्याने गावरान कोंबड्या विक्रीसाठी कालच पिंजऱ्यात आणून ठेवल्या होत्या; मात्र सकाळी दुकान उघडले आणि शेजारील पिंजऱ्यात पाहिले तर कोणी तरी पिंजऱ्याचे कुलूप तोडून आतमधून कोंबड्या चोरल्याचे समजले.

रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते; मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसान सहन करावा लागलं आहे.

सीसीटीव्ही कॅमे-यात घटना कैद

कोंबड्याचं चोरीला गेल्यानं मालकाला डोक्याला हात लावून बसायची पाळी आली होती. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता तीन अज्ञात इसम गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरून हडपसरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात पाचशे रुपयाच्या वीस कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे.

Advertisement