मुंबई : जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या (Public Trust Registration Office) नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी निवेदकाने शायरीतून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

निवेदकाने शायरीतून ‘हर खदान मे हिरा मिल नही सकता, हर बाग मे फुल खिल नही सकता; युं तो धन दौलत मिल जाती है सभी को, किंतू हमारे उद्धव ठाकरेजी जैसा दुसरा व्यक्तीमत्व संसार मे हो नकी सकता’ असे बोलत उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

या प्रेम व आदरात्मक शब्दांचा उद्धव ठाकरे यांनी स्विकार करत म्हणाले की ‘आतापर्यंत माझ्या हस्ते अनेक भूमिपूजन, अनेक उद्घाटने झाली. पण आता जे माझे वर्णन केले गेले ते ऐकल्यानंतर नाही म्हटले तरी माझ्यावर एक दबाव आला आहे.

Advertisement

याचे कारण असे आहे की आपल्यालाही कल्पना असेल की, सलमान खान (Salman Khan) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचा तो चित्रपट. ज्यामध्ये सोनाक्षी म्हणते की ‘थप्पड से डर नही लगता साहब प्यार से लगता है’.

तसेच आम्ही राजकारणी लोकांचीही प्रेमाचे शब्द ऐकले की धडधड वाढते. याचे कारण असे आहे की नेहमी थपडा देणे आणि थपडा खाणे हे आमचे आयुष्य आहे. त्यामुळे कौतुक केले की थोडीशी धडधड होते. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

या कार्यक्रमावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग.

Advertisement

विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड.

अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मदाय वकील संघटनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement