मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आगामी काळात महापालिकांच्या निवडणूका (Muncipal corporation election) होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शिवतीर्थावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थित बैठक घेण्यात पार पडली आहे.

राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मनसेचा निवडणुकीबाबत काय प्लॅन आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, महापालिका निवडणुकीत ‘किंग मेकर’ (king Maker)  बनण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. कारण आम्ही ‘किंग’ (King) बनणार आहोत.

Advertisement

महापालिका निवडणुकीआधी होणाऱ्या प्रभाग पुनर्रचना आणि त्यात ज्या काही सूचना असतील त्या सर्वांनी द्याव्यात असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांवर चर्चा केली जाईल असेही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्या बैठकीसाठी पुलांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले, “आज मुंबईसोडून पुणे, नाशिक आणि इतर महापालिकांबाबत चर्चा झाली. प्रत्येकाला स्वत:चा अहवाल देण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत.

Advertisement

प्रत्येक समितीमध्ये तीन ते चार सदस्य नेमले आहेत”, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे. मनसे येणाऱ्या महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे याआधीही जाहीर करण्यात आले आहे.