मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना (Union Home Minister) पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी किरीट सोमय्याची हत्या करण्याचा प्लॅन (Murder plan)होता असा गंभीर आरोप केला आहे.

पुण्यात (Pune)  किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुकी केली होती. त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप नेत्यांकडून शिवसेना नेत्यांवर कडाडून टीका करण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हंटले आहे की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉब लिचिंगचा कट रचला होता. मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Advertisement

किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. याप्रकरणी आता केंद्रानं (Centre Government) जातीनं लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांवरही (Police) आरोप केले आहेत. ते म्हणाले, किरीट सोमय्यांना संरक्षण द्यायचे सोडून पोलिसही सरकारच्या कट कारस्थानात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलमे लावत मुद्दामून हल्लेखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

Advertisement