पुणे महापालिकेत समाविष्ट होणा-या २३ गावांतील अनेकांना नगरसेवक होण्याचे वेध लागले असले, तरी लोकसंख्येच्या हिशेबात दोनच नगरसेवक वाढणार असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

प्रभाग रचनेचा मार्ग मोकळा

2011 ज्या लोकसंख्येनुसारच ही निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांची संख्या 164 वरून 166 इतकी होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधून आता नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणा-या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी पडणार आहे.

आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीने हद्दीलगतची 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

गावांच्या समावेशानंतर आता प्रभाग रचनेचा मार्गही मोकळा झाला असून निवडणूक प्रक्रियेला अप्रत्यक्षरित्या सुरुवात होणार आहे.

या गावांच्या समावेशानंतरही तेथील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह राजकीय पक्षाच्या इच्छुकांचा नगरसेवक होण्याचा मार्ग खडतर आहे.

अशी ठरते नगरसेवकांची संख्या

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या 2016 कायद्यातील सुधारीत तरतुदीनुसार 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला एक नगरसेवक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

Advertisement

त्यानुसार 2011 ची महापालिकेची लोकसंख्या 31 लाख 24 हजार इतकी आहे. त्यानुसार 2017 च्या महापालिका निवडणूकीत 30 लाख लोकसंख्येला 161 आणि त्यावरील 1 लाख लोकसंख्येमागे एक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या 162 इतकी होती.

त्यानंतर ऑक्टोबर 2017 ला महापालिकेत 11 गावे समाविष्ट झाली. या गावांची लोकसंख्या दीड लाख इतकी होती. त्यामुळे केवळ दोन नगरसेवकांची संख्या वाढून ही संख्या 164 इतकी झाली.

आता 23 गावांची लोकसंख्या दोन लाख 22 हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे महापालिकेची एकूण लोकसंख्या आता 35 लाख इतकी होत आहे.

Advertisement

त्यानुसार आता 30 लाख लोकसंख्येमागे 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक याप्रमाणे पाच लाख लोकसंख्येमागे पाच नगरसेवक याप्रमाणे नगरसेवकांची संख्या 166 इतकीच होईल. सद्या नगरसेवकांची संख्या 164 इतकी आहे.

 

Advertisement