पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोर कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतीच भाजपचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिल्लीत ही भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, तसंच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. स्वतः अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत.

कोल्हे (Amol Kolhe) यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने शाह यांची भेट घेतली असली तरी त्यांच्या भेटीला राजकीय वळण देण्यात आलं आहे. अश्यातच त्यांच्या या भेटीवर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil ) म्हणाले, ‘ते भाजपमध्ये जाणार का नाही? हा विषय अमोल कोल्हे आणि भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यातला आहे. या कारणासाठी ते तिकडे गेले असावेत, असं मला वाटत नाही, त्यांचा एकच हेतू होता. गरुडझेप चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं निमंत्रण देण्यासाठी ते त्याठिकाणी गेले होते.

मलाही त्यांनी निमंत्रण पाठवलं आहे, फोनही केला. खरी परिस्थिती काही वेगळी असेल तर सांगता येत नाही’, असं वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil ) यांनी केलं आहे.

अमोल कोल्हे ट्विट काय म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने 356 वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली,

तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. माननीय गृहमंत्री महोदयांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं.