file photo

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले जात आहे; पण विरोधकांचा उमेदवार निवडून येत नाही.

आमच्या खासदार, आमदारांची संख्या जास्त आहे. पवार यांना बळीचा बकरा बनवत आहेत, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल आवश्यक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असे सांगितले. या समाजाला लवकर आरक्षण द्यायचे असेल, तर त्याचे अधिकार राज्याला देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची तीन टप्प्यात वर्गवारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याकडे करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

जातीनिहाय जनगणना करा

‘‘इम्पिरिकल डेटा अपूर्ण आहे, त्यामुळे तो देण्यात अडचणी आहेत. २०२१ ची जनगणना जातीनिहाय करावी, यामुळे जातिवाद वाढणार नाही.

समाजात आता परिवर्तन झाले असून, सर्वजण एकत्र आहेत. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या नेत्या आहेत, केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून त्या नाराज असल्या, तरी त्या भाजप सोडणार नाहीत, भाजपमध्येच राहतील.

Advertisement

पंकजा या केंद्रीय स्तरावर काम करत आहेत, जी जबाबदारी दिलेली आहे, ती उत्तम पद्धतीने पार पाडावी, असे आठवले यांनी सांगितले.

शिवसेनेने भाजपसोबत यावे

महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे, त्यांच्यात ताळमेळ नाही. नाना पटोले रोज सत्तेतील कोणावर ना कोणावर आरोप करत आहेत.

त्यामळे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास त्यांनी भाजप व आरपीआय सोबत यावे. ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहिल्यास भविष्यात शिवसेनेचे नुकसान होणार आहे, असे भाकीत आठवले यांनी केले.

Advertisement