मुंबई : भाजपचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) सरकार १० मार्च नंतर पडेल असा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे हे बोलताना म्हणाले, चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत.

मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत असे म्हणत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Advertisement

बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडले तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे.

सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही,असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

Advertisement

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.

Advertisement