चाकण -शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी (ता. खेड ) गावच्या हद्दीतील अंबिका माता मंदिरात ठेवलेल्या दान पेटीतून दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी पैसे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

येथील पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी दोन भामट्यावर गुन्हा दाखल केला. संतोष मल्हारी शेटे (वय ४६, रा. साबळेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर ठेवलेल्या दानपेटीचे कुलून तोडून त्यातील पाच ते सहा हजार रुपयांची रोख रक्‍कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement