ईडीने यापूर्वी दोनदा समन्स बजावूनही चाैकशीला गैरहजर राहणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने आणखी एक समन्स बजावले आहे.

आजाराचे कारण सांगून कार्यालयात यायला टाळाटाळ

देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स बजावले आहे. सोमवारी ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे ईडीने देशमुख यांना बजावले आहे.

माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही, असे देशमुख यांनी ईडीला कळवले होते. इतकेच नाही, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी चौकशीसाठी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.

Advertisement

ईडीविरोधात न्यायालयात दाद मागणार

ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कोर्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत.

कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे.

दस्तावेज द्या, चाैकशीला तयार

आपण सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयारच आहोत; परंतु आधी आपल्याला दस्तावेज देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून केली होती. देशमुख यांनी ईडीकडे या प्रकरणाच्या ईसीआयआरची प्रत देखील मागितली आहे.

Advertisement

शंभर कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी नेमकी कशाप्रकारच्या तक्रारीचा अहवाल तयार करण्यात आला याची सविस्तर माहिती या ईसीआयआरमध्ये असते.

 

Advertisement