राॅ ची भीती दाखवून एका तरुणीला लुटण्याचा प्रकार होऊन २४ तास झाले नाही, तोच आता फसवणुकीचा नवा प्रकार उघडकी आला आहे.

परदेशात वैद्यकीय व्यवसायाचा परवाना देण्याच्या आमिषाने एकाला तीस लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोघांविरोधात गुन्हा

याबाबत केदार गणला (वय ५२, रा. मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमेंद्र सारस्वत (४३) आणि नेहा सारस्वत (दोघेही रा. जयरास कॉप्लेक्स, बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

बोपोडी येथे २०१८ ते जुलै २०२१ कालावधीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार आणि सारस्वत दाम्पत्याची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती.

अशी झाली फसवणूक

दाम्पत्याने केदार यांना इथिओपिया देशातील कॉन्स्युलेट यांच्यासोबत ओळख असल्याचे सांगितले; तसेच त्या देशात त्यांच्या अधिपत्याखाली १० ते १२ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहेत. या देशात वैद्यकीय व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे.

या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ‘मेडिकल लायसन्स’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० लाख रुपये आरटीजीएस पद्धतीने घेतले. त्यानंतर काही दिवसांनी आणखी १० लाख रुपये घेतले.

Advertisement

मात्र, वैद्यकीय परवाना दिलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केदार यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

Advertisement