ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

संचालक करण्याच्या आमिषानं तीस लाखांना गंडा

पुण्यात दररोज वेगवेगळी आमिषं दाखवून गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. लोकही आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळं गंडा घालणा-यांचं फावतं. असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.

आर्थिक फायद्याच्या आमिषाला बळी

पुण्यातील एका नामांकित कंपनीत संचालक पद देऊन भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे.

आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळी आमिषं दाखवून फिर्यादीला तब्बल 30 लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीनं पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दोघांनी असा घातला गंडा

आशिष रामचंद्र काळे असं 43 वर्षीय फिर्यादी व्यक्तीचं नाव असून तो पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्याला आहे.

काही दिवसांपूर्वी फिर्यादीची ओळख मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी असणाऱ्या प्रतिम आनंद सरया आणि आनंद बकलेश सरया या दोघांशी झाली होती.

आरोपींनी फिर्यादीस गि शुभर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर हे पद देऊन भविष्यात आर्थिक फायदा मिळवून देण्याच आमिष दाखवलं.

आरोपींनी फिर्यादीला नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर पदही देऊ केलं. तेही नावापुरतं. नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर पदावर विराजमान होऊन एक वर्ष झालं तरी कोणताही आर्थिक फायदा झाला नाही.

त्यामुळे फिर्यादी काळे यांनी आरोपीकडे आपल्या पैशाची मागणी केली; पण आरोपींनी पैसे परत द्यायला नकार दिला आणि त्यांची फसवणूक केली.

You might also like
2 li