जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव दररोज वाढत असून, त्याचा फटका सामान्यांना बसतो आहे. भारतात तर पेट्रोल आता ११० रुपयांच्या उंबरठ्यावर आहे.

दुसरीकडं आज पेट्रोलियम कंपन्यांनी आश्चर्याचा धक्काच दिला. डिझेलच्या भावात तब्बल तीन महिन्यांनंतर कपात करण्यात आली.

भीतीचा गोळा

पेट्रोल पंपावर गेले, की दररोज पोटात भीतीचा गोळा यायचा. पेट्रोल, डिझेल आज किती जास्त खिसा कापणार, याची चिंता असायची. इंधन दरवाढीचा नागरिकांनी धसकाच घेतला आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर तीन महिन्यानंतर अल्पसा दिलासा मिळाला आहे. इंधन दरवाढीविरोधात जनतेत नाराजी असताना आता डिझेल स्वस्त झाले आहे. अर्थात हा दिलासा फार मोठा नाही.

पेट्रोलचा भडका

डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे, तर पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे. डिझेलच्या भावात कपात करण्यात आली असली, तर पेट्रोलच्या दरातील वाढ कायम आहे.

आज पेट्रोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२० रुपये झाला आहे, तर दर कपातीने मुंबईत डिझेलचा भाव ९७.२९ रुपये झाला आहे.

Advertisement

पेट्रोलियम कंपन्यांचे दणाणले धाबे

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावाने ७५ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कंपन्यांच्या आयात खर्चात वाढ झाली आहे. त्याचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे.

 

Advertisement