Deepak Chahar and Jaya Bhardwaj: टीम इंडियाचा स्टार (team India Star) ऑलराऊंडर (All rounder) दीपक चहरने यावर्षी 7 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न केले. दीपक आणि जया बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही (filmy lovestory). दीपक चहरने मधल्या मैदानावर आपले प्रेम व्यक्त केले होते.

दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज दिल्लीतील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते, त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात. दीपक चहरची बहीण मालती चहरने (maalti chahar)जयाला दीपकची भेट घडवून आणली होती.

दीपक चहर आणि जया भारद्वाज यांनी ७ जून रोजी आग्रा येथे सात फेऱ्या मारल्या. दीपक चहर आणि जया भारद्वाज यांच्यातील संबंध बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. चाहतेही दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

IPL 2021 मध्ये दीपक चहरने स्टेडियममध्येच जया भारद्वाज यांना प्रपोज केले होते (proposed in cricket stadium). त्यावेळी जया सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. दीपक चहरने जया भारद्वाज यांना प्रपोज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

जया भारद्वाज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. दीपक चहरला सपोर्ट करण्यासाठी ती मॅच पाहायलाही जाते.

दुखापतीतून सावरल्यानंतर दीपक चहर नुकताच टीम इंडियात परतला आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. दीपक चहर हा त्याच्या किलर बॉलिंग आणि धडाकेबाज फलंदाजीत निष्णात खेळाडू आहे.