माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चार कोटी वीस लाख रुपयांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ‘ईडी’ने केलेली ही कारवाई म्हणजे देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.

अखेर या प्रकरणात देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ‘ईडी’ने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.

Advertisement

देशमुख यांच्या घरी धाड

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी एप्रिल महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून देशमुख यांच्या घरी धाड टाकण्यात आली होती.

परमबीर यांचा लेटर बॉम्ब

परमबीर यांनी लेटर बॉम्ब टाकत देखमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता.

Advertisement

देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते; मात्र या प्रकरणात देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले आणि अटक केली.

 

Advertisement