व्यावसायिक फोटोग्राफर नसले, तरी आपल्या मोबाईलमधील कॅमे-यानं वेगळं काही टिपता आलं, तर त्यांचं काैतुक तर होतंच; परंतु एखादी कलाकृती जगन्मान्य होऊन जाते. पुण्यातील शरन शेट्टी यांच्याबाबतीत तेच झालं.

आयफोनची एंट्री झाल्यानंतरच फोटोग्राफर

शरन शेट्टी यांना २०२१ चा आयफोन फोटोग्राफी ॲवार्ड मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात असलेले शरन हे फोटोग्राफर नाहीत; मात्र असे असतानाही त्यांच्या फोटोला आयफोन फोटोग्राफी पुरस्कार मिळाला आहे. याबाबत सांगतात, ‘माझ्या आयुष्यात आयफोनची एंट्री झाल्यानंतरच मी फोटोग्राफर झालो.’

कोणत्या फोटोसाठी पुरस्कार ?

‘बाँडिंग’ या फोटोसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांनी २०१९ मध्ये अझरबैझान येथील यानार डांग येथे हा फोटो काढला होता. फोटोबाबत ते म्हणाले, ‘घोड्याचे आणि त्या माणसाच्या नात्याने माझे लक्ष त्यांच्याकडे वेधले.

Advertisement

दोघेही डोंगर चढून थकले होते व त्यांनी आराम करण्याचा निर्णय घेतला होता.’ त्या दोघांचे एकमेकांसोबत असे नाते होते की त्यामुळेच फोटोला ‘बाँडिंग’, असं नाव दिलं.

अनपेक्षित धक्का

आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नसल्याने हा पुरस्कार जिंकतील असे त्यांना वाटले नव्हते; मात्र आयफोनसाठी असलेले प्रेम आणि त्यांच्या अगदी जवळचा असलेला हा फोटो त्यांनी स्पर्धेसाठी पाठवला.

स्पर्धेत हा फोटो जिंकला आहे यावर विश्वास बसणे त्यांना सुरुवातीला कठीण जात होते; मात्र कोठेतरी या फोटोचा उल्लेख व्हावा असेही त्यांना वाटत होते.

Advertisement

कोणताही क्षण मिस होत नाही

शेट्टी यांनी सुरुवातीला लँडस्केप फोटो काढण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते पोर्ट्रेट फोटो काढू लागले. मनुष्य, त्यांचा स्वभाव, संस्कृती आणि त्यांचे निसर्गासोबत असलेले नातेच मला प्रेरणा देते, असे ते सांगतात.

आयफोनसोबत शेट्टी यांच्या फोटोग्राफीला सुरुवात झाली. हे खूपच सोपे, खिशात देखील बसतो व कोणताही क्षण यामुळे मिस होत नाही, असे ते सांगतात.

‘मी बटन्स किंवा कॅमेरा सेटिंग्सची जास्त काळजी करत नाही, कारण चांगल्या फोटोसाठी आवश्यक असलेले फीचर्स हे सेटिंग्समध्ये आधीच असतात, असे शेट्टी म्हणाले.

Advertisement