राज्यातील सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणा-या 18 वितरकांची तब्बल 90 कोटी रुपयांची देयके ठाकरे सरकारने थकवली आहेत.

त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला असून, या १८ वितरकांनी राज्य सरकार आणि राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

१८ महिन्यांपासून बिले थकीत

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील खरेदी कक्षाकडून ही देयके मागील 18 महिन्यांपासून थकवली आहेत.

Advertisement

त्यामुळे कच्च्या मालाची देयके, कर्मचा-यांचे वेतन, कर्जाचे हप्ते थकल्याने आमच्याकडे मरणाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे देयके तातडीने मंजूर न झाल्यास राष्ट्रपतींकडे इच्छामरणासाठी अर्ज करण्यात येईल, असा इशारा औषध वितरकांनी राज्य सरकारला दिला आहे.

खरेदी कक्षाकडून अडवणूक

राज्य सरकार दरवर्षी हाफकिनमधील खरेदी कक्षाच्या माध्यमातून निविदा काढून मोठ्या प्रमाणात वितरकांकडून औषध खरेदी करते.

Advertisement

ही औषधे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार वितरित करण्यात येतात; मात्र 2017-18 पासून खरेदी कक्षाने वितरकांकडून खरेदी केलेल्या औषधांची देयके देयके थकवली आहेत.

ही देयके मंजूर करण्यासंदर्भात वितरकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती आहे.

कागदपत्रे जमा करूनही देयके थकीत

16 मार्च 2018 रोजी खरेदी कक्षाकडून देयके मंजूर करण्यासाठी वितरकांना काही कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Advertisement

यामध्ये सप्लायर इनव्हॉईस, बॅचचा लॅब रिपोर्ट, अॅक्सेप्टन्स सर्टिफिकेट, बँक खात्याच्या माहितीचा समावेश होता.

ही कागदपत्रे वितरकांनी खरेदी कक्षाकडे जमा करून तब्बल 18 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी राज्य सरकारकडून वितरकांची देयके मंजूर करण्यात आली नाहीत.

Advertisement