मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषद (Press conference) घेतली होती. त्याआधी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अलिबागमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे १९ बंगले असल्याचे विधान केले होते.

सोमय्या यांनी केलेल्या विधानावर काल पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी हे १९ बंगले असतील तर मी राजकारण सोडेल असे सांगितले आहे. तसेच आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्याने मारू असा इशाराही त्यांनी दिला होता.

यावर आज सोमय्या यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन १९ बंगल्यांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले आहेत. तसेच हे पुरावे मी याआधीदेखील पत्रकारांसमोर ठेवले होते, असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement

यावरून आता सोमय्या म्हणाले की, ‘हे बंगले किरीट सोमय्यांच्या नावे नाही तर रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावाने आहेत, रश्मी उद्धव ठाकरे यांनी २०१९-२० वर्षासाठीचा हा टॅक्स भरला आहे.

त्याआधीचा टॅक्स १२/११/२०२० ला अन्वय नाइकच्या नावाने होता. हा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. किरीट सोमय्याने नाही. संजय राऊत साहेब, आपण जोड्याने कुणाला मारणार?

१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत १९ बंगल्याचा घरपट्टी, दिवबत्ती कर, आरोग्य कर हा रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट आरटीजीएस केलेला दिसतोय. अन्वय नाइक आणि उद्धव ठाकरे यांचे जमिनीसंबंध किरीट सोमय्याने खुलासा केला होता. त्यानंतर हे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.’

Advertisement

हे पुरावे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सादर केले आहेत. व संजय राऊत यांच्या विधानावर पलटवार केला आहे.