प्रशांत रामभाऊ साबळे याने ‘जिल्हाधिकाऱ्यांना मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून 1999 सालापासून काम करत असल्याने शासकीय सेवेत सामावून घेऊन कोतवाल पदावर नियुक्ती द्यावी’ नाहीतर मी विष प्राशन करून किंवा आत्मदहन करून आत्महत्या करीत असल्याची धमकी दिली आहे.

ही धमकी त्याने व्हॉट्सअपद्वारे दिली होती. याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 पासून आजपर्यंत सेवेत येणाऱ्या सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्याने असे प्रकार केल्याचेही उघड झाले आहे.

या प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. प्रशांत साबळेचा वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,

Advertisement

तहसीलदार जिल्हाधिकारी तसेच विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासकीय सेवेत थेट पद्धतीने नियुक्ती मिळण्यास पात्र ठरत नसल्यासंदर्भात त्याचे सर्वच अर्ज निकाली काढले होते.

त्यामुळे वेळोवेळी त्याच्या अशा धमक्या येत होत्या. याप्रकरणी बनावट कागदपत्रांच्या जोरावर कामावर घ्या,अशी धमकी दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण माहितीचा तपास मिळवून धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement