राज्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन हजार १९० शाळा एकशिक्षकी आहेत. तर खासगी अनुदानित १३० आणि खासगी विनाअनुदानित १५५ शाळा एकशिक्षकी आहेत. त्यामुळे अजूनही राज्यातील अनेक शाळांचा कारभार एकाच शिक्षकांवर चालत आहे.

यामुळं निर्माण झाल्या एकशिक्षकी शाळा

राज्य शासनाच्या ‘मिशन ब्लॅक बोर्ड’ या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकात राज्यातील एकशिक्षकी शाळा शिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे शाळांसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले गेले; परंतु गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत वाढ झाली.

Advertisement

त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आकर्षित होणा-या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत गेली.

विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या.

दुर्गम भागात शाळा बंद

विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दुर्गम भागातील काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु सर्वच क्षेत्रांतून त्यावर टीका झाल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला; परंतु विद्यार्थीच नाहीत अशा दुर्गम भागात शाळा सुरू ठेवून उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असेल, तर त्या शाळेत विद्यार्थी जातील का, असाही प्रश्न पालक उपस्थित करत आहे.

 

Advertisement