ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर कायम वादग्रस्त बोलून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवत असतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ते खालच्या पातळीवर टीका करतात. अशातच त्यांच्या गाडीवर सोलापूर येथे दगडफेक करण्यात आली.

गाडीची काच फुटली, सुदैवाने कुणी जखमी नाही

ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्या वेळी पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेड झाली.

सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीचा काच फुटली आहे; मात्र गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. मोठी दुर्घटना टळली.

‘आज दगडफेक, उद्या गोळा मारतील’

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे, की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे.

ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का?

वैचारिक लढाई तर विचाराने चाला; पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील; पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही.

पडळकरांची शरद पवारांवर टीका

पडळकर यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली.

You might also like
2 li