Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

टायगर ग्रुपच्या खंडणीबहाद्दर गुंडांना अटक !

पोलीस असल्याची बतावणी तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी होमगार्ड, ग्राम सुरक्षा दल सदस्य आणि टायगर ग्रुपचा शहराध्यक्ष व सदस्यांसह सात जणांना बेड्या ठोकल्या.

त्यांनी या प्रकारे आणखी किती जणांकडून खंडणी वसूल केली आहे याबाबत तपास सुरु आहे. याप्रकरणी अशोक बेलिराम आगरवाल (वय ५३, रा. विकास नगर, किवळे) यांनी फिर्याद दिली. सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०), राहुल छगन लोंढे (वय २४),

प्रकाश मधुकर सजगणे (वय ३१), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे (रा. सर्वजण वाकड) यांना अटक करण्यात आली आहे. हारकरे हा होमगार्ड तर लांडगे हा आयुक्तांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा दलाचा सदस्य आहे.

गायकवाड हा टायगर ग्रुप पिंपरी चिंचवडचा शहराध्यक्ष असून इतर आरोपी सदस्य आहेत. मंगळवारी दुपारी आरोपी टोळके आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. तसेच आम्ही पोलिस असून या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले. दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली.

Leave a comment