Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

उपमुख्यमंत्र्यांवर माफी मागण्याची वेळ

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याबाबत अतिशय जागरूक आहेत. गर्दी केली, तर कारवाई करण्याचा त्यांनी दिला.

पुण्याबाहेर गेलेल्यांना १५ दिवस विलगीकरणात ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने नियमांची पायमल्ली झाली. त्यामुळे पवार यांना माफी मागावी लागली.

नियमांचे उल्लंघन
पुण्यामध्ये वीकएंड लॉकडाऊन असल्याने नागरिकांवर निर्बंध असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शहर कायार्लयाच्या उद‌्घाटनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करताना कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले.

विशेष म्हणजे, कोरोनामुळे पाळावयाच्या निर्बंधाबाबत आग्रही असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जमावबंदी आणि संचारबंदी असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले होते.

पवार यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला, तेव्हा त्यांनाही गर्दीतून वाट काढत जावे लागले. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली; मात्र कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित राहिलेच.

भाजपची टीका
कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेली गर्दी ही पुणेकरांच्या जिवाशी खेळणारी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.

त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष जगताप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गर्दी जमवितात. हा प्रकार म्हणजे ”तुम्ही काहीही बोला,

पण मला वाटेल तेच मी करणार”, असे वागण्याचाच प्रकार असल्याची टीका सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.

गर्दीचा फोटो झाला व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या गर्दीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. शनिवार- रविवार घरातच राहा,

बाहेर पडू नका असे आवाहन करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही गर्दी कशी चालते, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. नियम फक्त आम्हालाच का? असेही विचारले आत आहे.

Leave a comment